काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी उचलून नेल्या खुर्च्या

abdul-sattar
औरंगाबाद – काँग्रेसने लोकसभेसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून या यादीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून आमदार सुभाष झांबड यांना लोकसभेची उमेदवारी घोषित करण्यात आली. यानंतर नाराज झालेल्या आमदार अब्दुल सत्तार यांनी शहागंज येथील काँग्रेस भवनला दिलेल्या खुर्च्या परत नेल्याची घटना समोर आली आहे. या खुर्च्या अब्दुल सत्तार यांचे स्वीय सहाय्यक यांनी परत नेल्या आहेत. अब्दुल सत्तार यांनी २००८ साली काँग्रेस भवनला ३०० खुर्च्या भेट म्हणून दिल्या होत्या.
ऐन निवडणुकीच्या काळात अब्दुल सत्तार यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी दिलेल्या खुर्च्या या परत नेल्याने काँग्रेस भवनचा भव्य हॉल रिकामा पडल्यामुळे राष्ट्रवादी भवनमध्ये काँग्रेसला आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी आमदार सुभाष झांबड यांना लोकसभेची उमेदवारी घोषित झाल्यानंतर बंडाचा झेंडा उगारत, अपक्ष उमेदवारी जाहीर केली. त्याचबरोबर त्यांनी आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याची घोषणा देखील त्यांनी केली.
अब्दुल सत्तार यांच्या स्वीय सहाय्यकाने अचानक सत्तार यांनी दिलेल्या ३०० खुर्च्या परत नेल्या. काँग्रेसच्या गोटात सत्तार यांच्या या कृत्याने निश्चितच खळबळ उडाली आहे. नगराध्यक्ष, आमदार असे अनेक पद काँग्रेसमुळे भूषवणाऱ्या सत्तार यांनी असे करावे का असा प्रश्न काँग्रेसच्या गोटातून उपस्थित केला जात आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget