Aple Pandharpur


Latest Post

rajendra-gavit
मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मागील वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतरही श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली जाईल असे जाहीर केले होते. पण आता राजकीय समीकरणे युती आणि महाआघाडीमुळे बदलल्याने उमेदवारी गावित यांना द्यावी असा आग्रह भाजपकडून होत असल्यामुळे राजेंद्र गावित यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश करून त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात येणार आहे. तर विधानसभेत श्रीनिवास वनगा यांचे पुर्नवसन केले जाणार आहे
भाजप आणि शिवसेनेत पालघरचे भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत जोरदार संघर्ष झाला होता. वनगा यांच्या कुटुंबियांवर या पोटनिवडणुकीत अन्याय होत असून त्यांच्या मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेना आग्रही होती. काँग्रेसचे माजी आमदार राजेंद्र गावित यांना भाजपने उमेदवारी दिली होती. भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत त्या पोटनिवडणुकीत पाहायला मिळाली. पण त्याच शिवसेनेने आता यु टर्न घेत श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी न देता काँग्रेसमधून आलेल्या भाजपच्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला महाआघाडीने पालघरची जागा सोडली आहे.

abdul-sattar
औरंगाबाद – काँग्रेसने लोकसभेसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून या यादीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून आमदार सुभाष झांबड यांना लोकसभेची उमेदवारी घोषित करण्यात आली. यानंतर नाराज झालेल्या आमदार अब्दुल सत्तार यांनी शहागंज येथील काँग्रेस भवनला दिलेल्या खुर्च्या परत नेल्याची घटना समोर आली आहे. या खुर्च्या अब्दुल सत्तार यांचे स्वीय सहाय्यक यांनी परत नेल्या आहेत. अब्दुल सत्तार यांनी २००८ साली काँग्रेस भवनला ३०० खुर्च्या भेट म्हणून दिल्या होत्या.
ऐन निवडणुकीच्या काळात अब्दुल सत्तार यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी दिलेल्या खुर्च्या या परत नेल्याने काँग्रेस भवनचा भव्य हॉल रिकामा पडल्यामुळे राष्ट्रवादी भवनमध्ये काँग्रेसला आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी आमदार सुभाष झांबड यांना लोकसभेची उमेदवारी घोषित झाल्यानंतर बंडाचा झेंडा उगारत, अपक्ष उमेदवारी जाहीर केली. त्याचबरोबर त्यांनी आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याची घोषणा देखील त्यांनी केली.
अब्दुल सत्तार यांच्या स्वीय सहाय्यकाने अचानक सत्तार यांनी दिलेल्या ३०० खुर्च्या परत नेल्या. काँग्रेसच्या गोटात सत्तार यांच्या या कृत्याने निश्चितच खळबळ उडाली आहे. नगराध्यक्ष, आमदार असे अनेक पद काँग्रेसमुळे भूषवणाऱ्या सत्तार यांनी असे करावे का असा प्रश्न काँग्रेसच्या गोटातून उपस्थित केला जात आहे.

govind-pansare
मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेवर जेष्ठ पुरोगामी नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या चौकशीत प्रगतीचा अभाव असल्यामुळे नाराजी व्यक्त केल्यानंतर गृह विभागाने लगेचच या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यांसाठीच्या इनामामध्ये 50 लाखांची वाढ केली असून मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्याला आता 10 लाखांऐवजी 50 लाखांचे इनाम आता देण्यात येणार आहे,
आजपर्यंत एकूण आठ जणांच्या विरोधात पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. पण संशयित आरोपी सारंग अकोलकर आणि विनय पवार तपास पथकाला चकवा देत अद्यापही फरार असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तींनी सुनावणीदरम्यान तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले होते. सरकारने त्यानंतर विशेष तपास पथकामधील अधिकाऱ्यांच्या संख्येत सुद्धा वाढ केली. आता एसआयटीमध्ये ७ ऐवजी १७ अधिकारी असणार आहेत.
डॉ. विरेंद्र तावडे आणि गायकवाडच्या कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी चौकशीतून सारंग अकोलकर, विनय पवार यांच्यासह अन्य चार संशयितांची नावे निष्पन्न झाली होती. एसआयटीने त्यानुसार अमोल काळेला १५ नोव्हेंबर २०१८, वासुदेव सुर्यवंशीला १ डिसेंबर २०१८, भरत कुरणेला १ डिसेंबर २०१८, अमित देगवेकरला १५ जानेवारी २०१९ मध्ये अटक केली होती. मास्टरमाईंड डॉ. वीरेंद्र तावडे यांनी कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येसाठी अमोल काळेसह चारही मारेकऱ्यांवर वेगवेगळी कामगिरी सोपवली होती. त्यांच्याकडे बॉम्बस्फोट घडविण्यासह अग्निशस्त्र चालविण्याच्या प्रशिक्षणाचीही जबाबदारी देण्यात आली होती. तर कॉम्रेड पानसरे यांचे निवासस्थान, बिंदूचौकातील कार्यालयाच्या रेकीची जबाबदारी देगवेकरवर सोपविण्यात आल्याचेही निष्पन्न झाल्याचे विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी न्यायालयात स्पष्ट केले होते.
दोषारोपपत्र या चौघांच्या विरोधात दाखल करण्यात आले आहे. सध्या दो

sanjay-kakde
पुणे: भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा बारामतीत, तर उदयनराजे भोसले यांचा साताऱ्यात जवळपास एक लाख मतांनी पराभव होईल, अशी आकडेवारी सादर केली. त्याचबरोबर संजय काकडे यांनी सुप्रिया सुळेंचा पराभव होईलच, शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना महायुतीचे सर्व 10 उमेदवार निवडून येतील, असा अंदाज व्यक्त केला.
संजय काकडे यांची आणि पुण्यातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांची भेट झाली. गिरीश बापट यांनी संजय काकडे यांच्या घरी जाऊन चाय पे चर्चा केली. त्यानंतर संजय काकडे म्हणाले, भाजप-शिवसेना महायुतीचे पुणे आणि बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व दहा जागांवर उमेदवार निवडून येतील. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडाला नक्कीच हादरा बसेल. त्याचबरोबर बारामतीतून सुप्रिया सुळेंचा 1 लाख मताधिक्याने पराभव होईल.
भाजपमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते येत असल्यामुळे आमची ताकद आणखी वाढली आहे. बारामतीत कांचन कुल यांच्याबाबत वातावरण अनुकूल आहे. याशिवाय खडकवासला, भोर, पुरंदर, दौंड मतदारसंघातून भाजपला आघाडी मिळेल. त्यामुळे सुप्रिया सुळेंचा पराभव निश्चित होईल, असा दावा संजय काकडेंनी केला. मी पुणे लोकसभा मतदारसंघात प्रचार करणार आहे. मी माझी जबाबदारी क्षमतेने पूर्ण केली. त्याचे निकाल सर्वांसमोर आहेत. गिरीश बापटांसोबत प्रचारासंदर्भात सविस्तर चर्चा झाली, असे काकडेंनी म्हटले आहे. केवळ पुणेच नाही तर बारामती आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे काकडे म्हणाले.

raju-shetty
कोल्हापूर : गेल्या पाच वर्षांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या मालमत्तेत 1 कोटी 52 लाख 60 हजार 263 रुपयांची वाढ झाली आहे. लोकसभा हातकणंगले मतदार संघातून राजू शेट्टी यांनी निवडणूकीचा उमेदवारी अर्ज भरला त्यांनी त्यामध्ये सादर केलेल्या विवरण पत्रात ही माहिती दिली आहे.
2014 ला त्यांची एकूण मालमत्ता 83 लाख 87 हजार 70 रुपये होती. आता ती 2019 ला 2 कोटी 36 लाख 47 हजार 333 रुपये एवढी झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आज करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी-स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आघाडीच्या वतीने हातकणंगले लोकसभा मतदार संघातून खासदार राजू शेट्टी यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला.
शेतकरी आणि आघाडी आपल्यासोबत असल्यामुळे माझा विजय नक्की असल्याचा विश्वास यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. तर दुसर्‍या बाजूला सांगली जिल्ह्याच्या जागेचा तिढा सुटला असून ती जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळाली असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली आहे. लवकरच उमेदवार ठरवण्याच्या बाबतीत निर्णय करु आणि वेळ पडल्यास काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराला आम्ही उमेदवारी द्यायला आम्ही तयार असल्याचेही शेट्टी म्हणाले.

sudam
भारतीय लग्न म्हणजे एकूण गडबड गोंधळ, ऐनवेळच्या मागण्या, रुसवाफुगवा असा जंगी कार्यक्रम असतो. मांडवात येणाअगोदर नवरदेवाने किंवा त्याच्या आईने काही मागण्या करायच्या मग वधू कडच्यानी त्या पुरवायच्या असाही एक सोहळा बरेचवेळा होतो. महाराष्ट्रातील जालना येथे मात्र एक वेगळाच प्रकार घडला असून येथे लग्नाच्या मांडवात जाण्याअगोदर नवरदेवाने लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याची इच्छा व्यक्त केली आणि नवरदेव लग्नाच्या पोशाखातच मित्र आणि कुटुंबियांसमवेत निवडणूक कार्यालयात पोहोचला आणि सर्व कागदपात्रांची पूर्तता करून त्याने अर्ज दाखल केलाही. त्यामुळे या लग्नाची चर्चा झाली नसती तरच नवल.
या नवरदेवाचे नाव आहे सुदाम इंगोले. तो मुलाचा जालनाच्या धारकल्याण गावाचा रहिवासी असून द्विपदवीधर आहे. त्याचे वडील शेतकरी आहेत. सुदाम यांचा विवाह गुरुवारी सायंकाळी बदनापूर तालुक्यातील उज्जैनपुरी गावात होणार होता. त्यासाठी वरात निघाली आणि नवरदेवाने उमेदवारी अर्ज दाखल करूनच मांडवात जाण्याचा निर्णय घेतलं. सुदाम सांगतात, शेतकऱ्यांना शिव्या घालून राजकारण करणाऱ्या उमेदवाराला हरविण्यासाठी मी निवडणूक लढवीत आहे. माझा जनतेवर विश्वास आहे आणि जनतेच्या आशीर्वादाने मी जिंकेन अशी खात्री वाटते आहे. या मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे निवडणूक लढवीत आहेत.
रावसाहेब दानवे यांनी काही काळापूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल काही आक्षेपार्ह विधाने केली होती त्यामुळे ते शेतकरी विरोधी असल्याची प्रतिमा या भागात निर्माण झाली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget